वागदरी येथे झिरो ते पाच वयाच्या बालकांना लसीकरण
वागदरी ,दि .२०
शासनाच्या आरोग्य सेवा छत्र या उपक्रमा अंतर्गत जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्गच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे ० ते ५ वयाच्या बालकांना लसीकरण करण्यात आले.
वागदरी येथील अंगणवाडी लसीकरण केंद्रात येथील ० ते ५ वयाच्या बालकांना भविष्यात निरोगी आयुष्य मिळावे पोलीओ,देवी वगैरे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता शासनाकडून आरोग्य सेवा छत्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्रा नळदुर्गच्या वतीने वागदरीत बालकांना लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सेविका आर.बी.घोबाळे, आरोग्य साहाय्यहीका एस.जे.उकीरडे,आरोग्य सेवक आर.बी.हावलदार यांनी लसीकरणाचे काम चोक बजावले.