रावणरुपी विकाराचे दहन केल्यास  प्रत्येक माणसात देवत्व येईल - बि. के शिल्पा बहेनजी


नळदुर्ग, दि.१९
 जगत अंबा मातेचे शारदीय नवराञोत्सव साजरा करण्यापुर्वी सर्वञ घरोघरी साफसफाई,स्वछता करुन घटस्थापना केली जाते. घराच्या स्वच्छते बरोबर मनाच्या स्वच्छतेची मानवाला गरज आहे . सध्याच्या कल युगातील मनुष्यामध्ये काम , क्रोध , लोभ , मोह , अहंकार संपावायचा असेल तर  आपल्या मधील रावणरुपी विकाराचे दहन करावा लागेल. तेंव्हाच प्रत्येक माणसात देवत्व येईल .नवरात्रीत जगत अंबेची उपासना करतात कारण जगत् जननी आहे . विश्व कल्याणकारी आहे. असे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचे उमरगा केंद्र संचालिका शिल्पा बहेनजी  यांनी  सांगितले.

 नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक जगदंबा देवी मंदिरात (अंबाबाई) नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात   बि. के .शिल्पा बहेनजी यानी नवराञाचे रहस्य व आध्यात्मिक याविषयीचे म्हत्व पटवुन सांगितले. 

शारदीय नवरात्र हे असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे, असे मानले जाते. या काळात माता दुर्गा पृथ्वीला आपली मातृभूमी मानून पृथ्वीवर येते. यानिमित्ताने ९ दिवस भाविक भक्त मातेला समर्पित उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसुन येतो. कार्यक्रमाच्या प्रारंंभी मान्यवाराचे सत्कारसुंदर भालकाटे , कविता पुदाले यांनी केले. तर बि. के शिल्पा बहेनजी यांनी लक्ष्मी नारायण देवतेची प्रतिमा रमेश जाधव , शिवाजी नाईक, संतोष पुदाले आदिना भेट दिली. शेवटी उपस्थितासमवेत मेडिटेशन करण्यात आले.

या कार्यक्रमास मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव, सदस्य सुरेश गायकवाड,  शिवसेनेचे शहरप्रमुख (ठाकरे गट) संतोष पुदाले , तालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर , 
पञकार शिवाजी नाईक , सहशिक्षीका , कविता पुदाले ,सुंदर भालकाटे , अंकिता दिदी, मल्लिनाथ कलशेट्टी आदीसह भाविक महिला , पुरुष उपस्थित होते.
 
Top