प्रेम बंधुभाव मैत्री समानता आणि स्वतंत्रता जपणारा तथागतांचा एकमेव बौध्द धम्म - पुज्य भन्ते संघानंद


नळदुर्ग,दि. २५: दादासाहेब बनसोडे

युद्धा शिवाय तथागतांच्या धम्म अचरणाने देशांमध्ये क्रांती घडवून आणली. तथागतांचा धम्म मानवा मानवामध्ये प्राणिमात्रांमध्ये प्रेम मैत्री बंधुभाव समानता आणि स्वतंत्रता खरा जपणारा जगातील एकमेव बौद्ध धम्मच असल्याचे  मत पूज्य भन्ते भिख्खु संघानंद यांनी धम्म देसना देताना व्यक्त केले.

नळदुर्ग शहरामध्ये समता आणि समानतेचा संदेश देत भव्य धम्मरॅली दि. २४ आॕक्टोंबर रोजी काढण्यात आली.  या धम्मारॅलीत  बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले होते. प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नालंदा बुद्ध विहार मंडळाच्या वतीने पूजन करण्यात आले. यावेळी पुज्य भन्ते भिख्खु संघानंद, पुज्य भन्ते नागबोधी, पुज्य भन्ते आनंद यांचे स्वागत करण्यात आले.

प्रकाशमान असणाऱ्या सम्बुद्धाचा सदधम्म १४ ऑक्टोबर १९५६ विजयादशमीच्या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  दिला हा धम्म मानवाच्या कल्याणासाठी. मानव कल्याण निर्मित बौद्ध धम्म आहे. या बौद्ध धम्मामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय असून याधम्माचे आचरण करण्याची आजच्या काळाची गरज आहे. याचबरोबर धाराशिव जिल्ह्याची भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणी व समता सैनिक दल हे प्रभावशाली , बलशाली असल्याचे  पूज्य भन्ते सघानंद यांनी सर्वांचं कौतुक केले.

 भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने समता सैनिक दलाचे सैनिक ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली त्यानंतर धम्म रॅलीला सुरुवात झाली .
यावेळी  दृष्टी समूहाचे उद्योजक अशोक  जगदाळे यांनी या  रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. तर  अमरदीप लेझीम संघाच्या कलापथकचे  नळदुर्ग शहरातील प्रत्येक  चौकात लेझीम पथकाचे सादरीकरण केले .  शहरातुन  शिस्तबद्ध पद्धतीने धम्मरॅली निघाली. ही धम्मरॅली बुद्ध विहारापासून  किल्ला गेट , क्रांती चौक , ऐतिहासिक चावडी चौक , भवानी चौक , शास्त्री चौक , डॉ बाबासाहेब  आंबेडकर संविधान चौक , अक्कलकोट रोड , बुद्धनगर, मार्गे भीमनगर नालंदा बुद्ध विहारासमोर या रॅलीची सांगता करण्यात आली.


याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयामाला धावारे,  कोषाध्यक्षा राजश्री कदम, पर्यटन विभाग प्रमुख विश्वास  पांडागळे, संस्कार सचिव कुमार ढेपे अदि उपस्थित होते.  पुज्य भन्ते भिख्खु संघानंद नागपूर ,पुज्य भन्ते नागबोधी सोलापूर वैराग, यांची बौद्ध उपासक व उपसिका यांना  नालंदा बुद्ध विहाराच्या समोर  धम्म देसना व   त्यांना मंडळाच्या वतीने योगेश दुरुगकर ,तुषार गायकवाड, कार्तिक बनसोडे ,बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे व प्रांजली कांबळे, सत्यवान कांबळे यांच्या वतीने चिवरदान करण्यात आले . 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार बौद्धाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले
नळदुर्ग शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
 
Top