महिलानी धम्म चळवळीत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे : कोमल झेंडारे

वागदरी ,दि.२७: एस.के.गायकवाड

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना स्वाभिमानाने जगण्यासाठी बौद्ध धम्म दिला असून ग्रामीण भागात धम्म चळवळ गतीमान करण्यासाठी महिलानी धम्म कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आठवड्यातून एकदा बौद्ध विहारात जावून बुद्ध वंदना घेतली पाहिजे असे प्रतिपादन कृषी सखी कोमल लक्ष्मण झेंडारे यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.



  पंचशील बुध्द विहार कमिटी वागदरी  व समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने ६७ व्या धम्म चक्र प्रर्वतन दिनाच्या वतीने येथील पंचशील बुध्द विहारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोमल झेंडारे बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुहिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पंचशील बुद्ध विहार कमिटी चे सचिव तथा  पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले.
  

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते मोहन वाघमारे, कुंडलिक वाघमारे,पांडुरंग बनसोडे,युवा कार्यकर्ते लक्ष्मण झेंडारे,मुकेश धाडवे, सुर्यकांत वाघमारे,माजी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, कविता गायकवाड,श्रीदेवी महादेव वाघमारे,शकुंतलाबाई वाघमारे,कमलबाई धाडवे,स्वाती गायकवाड,बाई भागवत वाघमारे, ठकुबाई वाघमारे,सह विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top