नळदुर्ग महाविद्यालयात ग्रीन क्लब स्थापना आणि एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा
नळदुर्ग ,दि.०५ डाॕ. दिपक जगदाळे /एस.के.गायकवाड
नळदुर्ग शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रीन क्लब स्थापना आणि एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ (UNICEF) महाराष्ट्र ह्याच्या संयुक् विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या युवा सहभाग व जल प्रबंधन कार्यात ACWADAM, पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE), Why Waste? सारख्या संस्थाच्या मदतीने युवा वर्गाला त्याच्या वागणुकीतील बदलातून जल संरक्षण सवयी सांगितल्या जाव्यात आणि यातून पुढे राज्याच्या जल संरक्षणाचे भविष्य बदलणार आहे. जल शक्ती अभियान आणि कॅच द रेन सारख्या उपक्रमामध्ये बळकटीकरण होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड हे होते. कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यांना पाणी घालून करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयातील ग्रीन क्लब समन्वयक प्रा. डॉ उद्धव भाले यांनी केले. याप्रसंगी ग्रीन क्लबची स्थापना करून त्यामधील विध्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सह समन्वयक प्रा.डॉ निलेश शेरे,शिक्षकेत्तर कर्मचारी श्री बारीक शिंदे,श्री.जेऊरे ऋषिकेश (युवा-अध्यक्ष),कु. वृषाली घंटे (युवा-उपाअध्यक्ष),श्री जाधव अभिषेक(युवा समन्वयक-अभियान), कु. पवार प्रज्ञा (युवा समन्वयक-दस्तऐवज), तसेच युवा सद्स्य म्हणून कु. सानिका महाबोले, श्री केशव राठोड, कु चव्हाण प्रियांका,श्री राजमाने ओंकार, श्री स्वामी शेशांग,कु. चव्हाण नम्रता कु कीर्ती इटकरी इ. नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आणि उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. सचिन चव्हाण,ग्रीन क्लब धाराशिव जिल्हा समन्वयक तथा मास्टर ट्रेनर,रा.गो शिंदे महाविद्यालय परंडा हे उपस्थित राहून पाणी बचत आणि हवामान कृतीसाठी युवा नेतृत्व किती महत्त्वाचे आहे, महाराष्ट्रातील लोकसांख्येच्या ३२ टक्के जनता १५ ते २९ वयोगटातील आहेत . म्हणजेच युवा वर्ग हा महाविद्यालीन आहे. त्यांना सहभागी करून घेतले आणि प्रशिक्षण दिले तर त्याच्यात निर्णय घेण्याची कौशल्य विकषित होतील व पुढे जाऊन हीच मंडळी भविष्यातील पाणी समस्या सोडवतील तसेच वातावरणातील बदल,उर्जा संवर्धन,जैवविविधता संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाचा जपण्याचे कौशल्य विकषित करुन पुढे हे प्रश्न सोडवतील असे प्रतीपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे, उपप्राचार्य प्रा चांद क़ुरेशी, समन्वयक डॉ शिवाजी घोडके, डॉ विजय सावंत,डॉ. हशीमबेग मिर्झा,डॉ.तुळशीराम दबडे,डॉ लक्ष्मण थिट्टे ,डॉ रोहिणी महिंद्रकर,प्रा लता डोणे, प्रा दादासाहेब जाधव,प्रा .बाबासाहेब सावते, डॉ युवराज पाटील, प्रा.महेंद्र भालेराव, प्रा समाधान शेनमारे, लेप्टनंट डॉ. अतिश तिडके,डॉ बाळासाहेब पाटील,प्रा अमर गडदे, प्रा राजेंद्र म्हमाणे, प्रा सज्जन देव्हारे इ कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि ग्रीन क्लब मधील ६० विध्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी केले. ग्रीन क्लब हे आपल्या जिवनाशी सातत्याने चालणारी बाब आहे .ते सर्वांनी आत्मसात करुन युवा पिढीने पुढाकार घ्यावा असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार डॉ निलेश शेरे यांनी मांडले.