वागदरीत  जावळे व सांगळे यांच्या बदली मुळे सत्कार करून दिला त्यांना निरोप :

वागदरी , दि.९ एस.के.गायकवाड :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील सहशिक्षक किसन जावळे व सहशिक्षिका सुषमा सांगळे यांची  ठिकाणी बदली झाल्यामुळे वागदरी ग्रामस्थ व शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. 

गुरुजी  शाळेतून बदलून जात असल्याचे विद्यार्थ्यांच्या कानावर पडताच  विद्यार्थ्यांना  डोळ्यातील अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला एखाद्या नवविवाहित मुलीला माहेरघरातून सासरी पाठविताना जे वातावरण निर्माण होते अगदी तसेच वातावरण कार्यक्रमाच्या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात निर्माण झाले होते.
  
 जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथे गेल्या चारपाच वर्षांपासून सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले किसन जावळे व सहशिक्षिका सुषमा सांगळे यांची अन्यत्र बदली झाल्याने येथील समस्त ग्रामस्थांच्या व शाळेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण चे प्रभारी अध्यक्ष उमाकांत मिटकर,ग्रा प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी ,उपसरपंच मिनाक्षीताई बिरादार आदी होते. 
  

प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून सत्कार मुर्ती किसन जावळे व सुषमा सांगळे यांचा  सत्कार करून त्यांना  ग्रामस्थ व शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. सत्काराला उत्तर देण्यासाठी जावळे सर उभारले असता विद्यार्थ्यांचा बराचवेळ ह्रदयात साठवून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला विद्यार्थी हुंदके देऊन रडायला लागले.
  

याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार पवार ,उपाध्यक्ष मदन पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,रिपाइं (आठवले)चे जिल्हा समन्वयक तथा पत्रकार एस.के.गायकवाड, दत्ता  सुरवसे ,प्रमोद बिराजदार, जितेंद्र पाटील, बजरंग मिटकर, सूर्यकांत वाघमारे,भाजपा मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ,मोहन सोमंवशी,अमोल गोगावे,सुदर्शन सुरवसे गणपत सुरवसे,बाळु पवार,पकंज सुरवसे,ग्रा. प.सदस्य आमोल पवार,आपा मिटकर,अमोल परिहार, आजय बिराजदार सहशिक्षिका मनिषा चौधरी, आरती साखरे,सिआरपी विद्या बिराजदार,महानंदा मिटकर, सुरेखा यादव अंगणवाडीच्या पद्मीनी पवार, रुपाली जाधव,अशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार,दत्ता पाटील, आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सहशिक्षक तानाजी लोहार  तर आभार  महादेवी जत्ते यांनी केले.
 
Top