माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विद्यार्थी संसदेची निवडणूक बिनविरोध    

                       
मुरूम, ता. उमरगा, दि. ९ : 

येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सोमवारी (ता.९) रोजी विद्यार्थी संसदेची निवडणूक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी फार्मसी कॉलेजचे समन्वयक प्रा. डॉ. रविंद्र आळंगे होते.


 यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, उपप्राचार्य योगेश पाटील आदींनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी प्रा. प्रियंका काजळे, प्रा. सुदिप ढंगे, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा. अनिल मोरे, प्रा. सदाफलमास मुजावर  आदींची प्रमुख उपस्थिती  होती. यावेळी बी. फार्मसी प्रथम वर्षातून वर्ग प्रतिनिधी  प्रणिता पुजारी, महिला प्रतिनिधी कु. वैष्णवी बायस,   द्वितीय वर्षामधून वर्गप्रतिनिधी नजीर जेवळे, महिला प्रतिनिधी अंजली जाधव तर डी. फार्मसी प्रथम वर्षातून वर्ग प्रतिनिधी नाबीलाल जमादार, महिला प्रतिनिधी आकांक्षा इंगळे, द्वितीय वर्षातून वर्गप्रतिनिधी संग्राम असबे, महिला प्रतिनिधी पूजा पाटील तर विद्यार्थी सचिव संग्राम असबे, सांस्कृतिक प्रतिनिधी प्रतिक्षा गायकवाड, क्रीडा प्रतिनिधी माधवराव बिराजदार आदींची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. 


तसेच बी. फार्मसी प्रथम वर्षाच्या वर्गशिक्षीका प्रा. सदाफलमास मुजावर, द्वितीय वर्षाचे प्रा. अनिल मोरे, डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या प्रा. प्रियंका काजळे, द्वितीय वर्षाच्या प्रा. राजनंदिनी लिमये यांची निवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने निवड झालेल्या सर्वप्रथम प्रतिनिधीची मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल कटके, किशोर कारभारी, चंद्रकांत पुजारी आदींनी निवडणूक प्रक्रियेत पुढाकार घेतला.                   

 
Top