नळदुर्ग , दि.१७
शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे रुपडे बदलुन पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचे प्रेणादायी कार्य करणारे युनिटी मल्टिकाॕन्स कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथिल विविध शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला.
नळदुर्ग येथिल जि .प. प्रशाला, जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, जि.प. कन्या प्रशाला,जि.प. उर्दु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तर आपलं घर येथिल अनाथ बालकाना व मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.
जि.प. प्रशाला याठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप मान्यवराच्या हास्ते करण्यात आले . यावेळी अनेकानी कफिल मौलवी यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवराचे शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे , नितीन कासार , मुश्ताक कुरेशी, उमेश जाधव ,बंडू कसेकर, सरदारसिंग ठाकूर , कमलाकर चव्हाण , संतोष पुदाले , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव , शहर पञकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे ,शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, तानाजी जाधव, लतीफ शेख,दादासाहेब बनसोडे, प्रदिप ठाकूर , अमर भाळे
नळदुर्ग किल्ल्याचे व्यवस्थापक जुबेर काझी , विनायक अहंंकारी , जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक इनामदार एन.एम, सौदागर बिलाल, जाधव एस.एम, लोहार ए. ए, श्रीमती कुलकर्णी ए. बी, कविता पुदाले, सय्यद टी. एम, मैदंर्गी एन.ए, हन्नुरे झेड.एस, मदारसे के.वाय, नागणे एस.एस, शेख युसूफ, दखनी एस.ए, दुगम ए. आर. आदी उपस्थित होते.