छायाचित्रासह मतदार यादी
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
विशेष मोहिमेतून होणार विद्यार्थ्यांची, महिला,दिव्यांग,तृतीयपंथी,भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदारांची नोंदणी  , 5 जानेवारी 2024 ला मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 

धाराशिव दि.01

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.तो पुढीलप्रमाणे आहे.दावे व हरकती स्वीकारणे - 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे व मतदार यादीतील नोंदणीच्या दुरुस्तीचे किंवा नाव वगळण्याचे अर्ज मागविण्यात येणार आहे.
              
 जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रस्तरावर मतदान नोंदणी विशेष शिबिराचे 4 नोव्हेंबर (शनिवार),5 नोव्हेंबर रविवार 25 नोव्हेंबर शनिवार व 26 नोव्हेंबर रविवार,सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदान नोंदणी शिबिरे तसेच महिला व दिव्यांगांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरे 18 नोव्हेंबर शनिवार,19 नोव्हेंबर रविवार, 2 डिसेंबर शनिवार व 3 डिसेंबर रविवार रोजी तृतीयपंथी,भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
          
26 डिसेंबर 2023 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील.1 जानेवारी 2024 पर्यंत मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणी, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे आणि 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
        
नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
 
Top