डॉ. राजाराम शेंडगे यांचा विविध संस्था व संघटनांच्या वतीने सत्कार
  संकटं हे उद्दिष्ट मार्गातील अनिवार्य बाबी असतात. प्रत्येकांनी उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करताना चांगले मित्र शोधणे आणि बाळगणे काळाची गरज :  डॉ. आर. डी. शेंडगे 

मुरुम, ता. उमरगा, दि १३ :

 उमरगा शहरात डॉ. के. डी. शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला नुकतीच मान्यता मिळून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था उमरगा संचलित, डॉ. के. डी. शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या रूपाने वैद्यकीय महाविद्यालयाची अनेक वर्षांपासूनची गरज होती. ती पुर्ण झाल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. डी. शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी डॉ. सचिन शेंडगे, डॉ. विजयकुमार बेडदूर्गे, विष्णू बिराजदार, प्रदीप मदने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंडू दुधभाते यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आपल्या मनोगतात  वैद्यकीय महाविद्यालय हे परिसरातील आरोग्य सेवेची मदत वाहिनी असून रूग्णांना विविध आजारावेळी सहज प्रबोधन घडविणारे केंद्र असते. ते डॉ. शेंडगे यांनी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. येणेगूर फेस्टीव्हलच्या वतीने प्रा. शिवराज गळाकाटे व प्रदिप मदने यांनी सत्कार केला. सत्कारानंतर डॉ. राजाराम शेंडगे यांनी आपले विचार मांडले. 


यावेळी तात्याराव फडताळे, प्रा. संदीप दुधभाते यांनीही मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त अभियंता मोहन दुधभाते, जि. प. अभियंता बाबूराव बारसे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, माजी मुख्याध्यापक शाहूराज घोडके, तुकाराम पितळे, राघवेंद्र गावडे,  गोळप्पा कांबळे, शिवराज गावडे , प्रा. गणेश ब्याळे, परमेश्वर शेंडगे, मोहन घोडके यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधवांची उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. विकास दुधभाते यांनी मानले.
 
Top