एकलमहिलासह समाजातील प्रत्येक घटकांचा विकास करणण्याचा प्रयत्न करणार : उमाकांत मिटकर

वागदरी, दि.१४ :एस.के.गायकवाड

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने एकलमहिलासह गोरगरीब समाजातल्या प्रत्येक घटकांच्या विकासाकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा वात्सल्य सामाजिक संस्थेचे संस्थापक उमाकांत मीटकर यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.
   वात्सल्य सामाजिक संस्था व मिटकर परिवाराच्या वतीने वागदरी येथील गरजू एकल महिलांना दिपावलीनिमीताने मोफत दिवाळी किटचे (साखर,तेल, चिरमुरे,मैदा,बेसन, मसाला, साबन) वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
 
  
 यावेळी ह.भ.प.सुरेशसिंग परिहार, जेष्ठ कार्यकर्ते राम सुरवसे, शिवाजी मीटकर, लक्ष्मण सुरवसे,निव्रती बिराजदार,नागनाथ जाधव,भालचंद्र यादव,शिक्षक सोसायटीचे चेअरमन प्रशांत मिटकर, ग्रा.सदस्य ज्ञानेश्वर पाटील,महादेव बिराजदार, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,रिपाइं (आठवले) चे  जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,भाजपा मेडियासेल चे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, सुदर्शन सुरवसे,महादेव मंदिराचे पुजारी जितेंद्र पाटील,मुकेश जाधव,ग्रा.प.सदस्य अंकुल वाघमारे, शरद पवार, अनिल धुमाळ,चंद्रकांत वाघमारे,सदन शेतकरी नागनाथ चव्हाण,उद्योगजक तात्या चव्हाण,सह युवा कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते किशोर सुरवसे यांनी कले.
 
Top