नळदुर्ग  येथे दि.१५ नोव्हेंबर पासुन  श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 

नळदुर्ग,दि.१५ : सुहास येडगे

नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे दि.१५ ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. याठिकाणी पारायण सोहळा साजरे होण्याचे हे ४५ वे वर्षे आहे. पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
       

 नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे सन १९७८ पासुन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होत आहे. यावर्षी पारायण सोहळा साजरा होण्याचे ४५ वे वर्ष आहे. यावर्षी दि.१५ ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मराठा गल्ली येथे वै. श्री शिवराम बुवा दिंडेगावकर यांच्या आशिर्वादाने, वै. श्री तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या कृपेने व वै. ह.भ. प.मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपेने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होणार आहे. पारायण कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ माऊलीची पुजा,७ ते ९ सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन,९ ते ९.३० विश्रांती,९.३० ते ११ वाचन,११ ते १२ भोजन,१२ ते २ महिलांचे भजन व भारुडाचा कार्यक्रम,२ ते ४.३० गाथा भजन,४.३० ते ५.३० प्रवचन,६ ते ७ हरीपाठ,७ ते ८ भोजन,८ ते १० कीर्तन व ११ ते पहाटे ४ हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
      
  पारायण कालावधीत ह.भ. प.श्री बलभीम बागल (चिकुंद्रा),ह.भ. प.श्री अशोक जाधव (बाभळगाव),ह.भ. प.श्री बाबुराव पुजारी (पाडोळी),ह.भ. प.श्री शिवाजी चव्हाण (चव्हाणवाडी),ह.भ. प.श्री मोहन पाटील (कीलज),ह.भ. प.श्री राजकुमार पाटील (वागदरी) यांचे प्रवचन होणार तर ह.भ. प.श्री दीपक निकम महाराज (धनगरवाडी),ह.भ. प.श्री राम महाराज गायकवाड (चिकुंद्रा),ह.भ. प.श्री विरपाक्ष महाराज (कानेगाव),ह.भ. प.श्री महेश महाराज (माकणी),ह.भ. प.श्री गुरुवर्य विठ्ठल महाराज (दिंडेगावकर),ह.भ. श्री गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर (वाशी) यांचे कीर्तन होणार आहे.
          

दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ पसायदान व काला ह.भ. प.श्री गुरुवर्य अप्पासाहेब दिंडेगावकर महाराज यांच्या हस्ते होणार आहे. काल्याचे कीर्तन ह.भ. प.श्री श्रीहरी ढेरे महाराज (काक्रंबा) यांचे होणार आहे.
 पारायण सोहळ्यात आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी, पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळाने केले आहे.
 
Top