प्रधानमंञी आवास योजना,रमाई आवास योजनेचा लाभाकरिता गुरुवार दि.१६ नोव्हेंबर रोजीपासुन नगरपरिषद कार्यालयसमोर  वसंतनगर, दुर्गानगर ,इंदिरानगर , बौध्दनगर,भिमनगर ,डॉ आंबेडकर नगर येथील नागरिकांचे अमरण उपोषण 

नळदुर्ग ,दि.१५  

नळदुर्ग  शहरातील शासकीय जागेवर राहणा-या  कुटूंबियाच्या घर जागेची नगरपरिषद दप्तरी नोंद करुन प्रधानमंञी आवास योजना,रमाई आवास योजनेचा लाभ मिळावे या करिता गुरुवार दि.१६ नोव्हेंबर रोजीपासुन नगरपरिषद कार्यालयसमोर  वसंतनगर, दुर्गानगर ,इंदिरानगर , बौध्दनगर,भिमनगर ,डॉ आंबेडकर नगर येथील नागरिकांचे अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे वरिल भागातील नागरिकानी जिल्हाधिकारी  याना दि.३० आँक्टोबर रोजी निवेदनाव्दारे  सांगितले आहे.

 नळदुर्ग शहरातील वसंतनगर, दुर्गानगर ,इंदिरानगर , बौध्दनगर,भिमनगर डॉ आंबेडकर नगर  आदी ठिकाणी गेल्या पाच दशकापुर्वीपासुन शासकिय जागेवर कब्जे वहिवटीनुसार राहणाऱ्या कुटूंबाच्या घरजागेची नगरपरिषद कार्यालयात भोगवटदार म्हणुन नोंद करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ  मिळावे नागरिक अनेक वर्षापासुन प्रशासनाचे उबंरठे झिजवित आहे.

 
न.प.कार्यालयाने जा.क्र.431/न.प.न/2023 दि.18/07/2023 रोजी लाभार्थ्याना नोटीस देऊन जिल्हाधिकारी  यांचे दि.17/07/2023 च्या निर्देशान्वये रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ देण्याकरीता शासकीय जागेवरील पात्र लाभार्थ्याकडुन आवश्यक ते कागदपत्राची मागणी केली. त्यानुसार लाभार्थ्यानी  वेळोवेळी नगरपरिषद कार्यालयास भरलेली घरपट्टी, नळपट्टी व इतर पुराव्यासह घरजागेचे भोगवाटदार म्हणुन नोंद करण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव दाखल केले. या घटनेला तीन महिने उलटून गेले आद्याप  पर्यंत नगरपरिषदेने भोगवाटदार म्हणुन नोंद करूण ८ अ ची नक्क्ल दिली नाही. त्यामुळे लाभार्थी  शासकीय योजनेपासुन वंचीत राहिलो आहे. 


यापुर्वी प्रशासनाला वेळोवेळी विनंती अर्ज देऊनही याविषयी जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. येत्या 10 दिवसात आम्ही राहत असलेल्या घरजागेचे न.प. कार्यालयात भोगवाटदार म्हणुन नोंद करून ८ अ ची नक्कल देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळवून दयावे. अन्यथा दि.16/11/2023 रोजी न.प.कार्यालय नळदुर्ग याठिकाणी अमरण उपोषणास बसणार आसल्याचे म्हटले आहे.
 
याची एक प्रत महितीस्त्व खासदार ओमराजे निबांळकर , आमदार राणाजगजतिससिंह पाटील ,उपविभागीय अधिकारी ,पोलिस अधिक्षक ,उपविभागीय पोलिस अधिकारी ,तहसिलदार , मुख्याधिकारी ,पोलिस निरिक्षक आदीना देण्यात आले आहे.
 
Top