भाजपा जिल्हा चिटणीस विलास राठोड यांच्याकडून दिवाळी भाऊबीज भेट म्हणून गरीब,गरजू महिलांना 200 साड्यां आणि फराळाचे वाटप
नळदुर्ग ,दि.१६ :
तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद येथे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हा चिटणीस विलास राठोड यांच्या परिवारातर्फे अलियाबाद येथील 200 गरीब,गरजू महिलांना दिवाळी भाऊबीज भेट म्हणून साड्यां व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच नुकतीच पार पडलेल्या येडोळा,रामतीर्थ ग्रामपंचायत निवडणूक मध्ये निवडून आलेल्या नूतन सरपंच, सदस्याचा ही सत्कार करून सन्मान करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दूरध्नीद्वारे उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अन्न निरीक्षक शंकर राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सोनटक्के, पत्रकार आरुण लोखंडे, अप्पू किलजे,दामाजी राठोड, पांडुरंग चव्हाण, सुभाष नाईक, व्यंकट पवार, सुरेश चव्हाण, संजय चव्हाण, गायक गणेश राठोड, ग्रा. प.सदस्य मनोज चव्हाण, श्रीमंत राठोड, हरिदास राठोड, प्रकाश राठोड, लक्ष्मण राठोड, रामू चव्हाण, बाबू राठोड, गुरुदेव राठोड, भूषण पवार, गोविंद राठोड, पवन चव्हाण, सचिन राठोड, इंजी.सुयोग राठोड, आशाताई राठोड, शांता राठोड, आशाताई पवार, फुलाबाई राठोड, रंजना राठोड, सपना राठोड, इंदुमती राठोड, सुजाता राठोड, सायली राठोड आदी पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी नाईक यांनी केले तर आभार विलास राठोड यांनी मानले.