नळदुर्ग : बोरी धरणातील पिण्याच्या पाण्याचा निर्माण झाला वाद
नळदुर्ग,दि.१० :
नळदुर्ग येथिल बोरी (कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणातील पिण्याच्या पाण्याबाबत माजी मंञी मधुकरराव चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते आशोक जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाले आहे.
या बोरी धरणातून तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरासह मुर्टा, चिकुंद्रा, अणदूर, नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा होत असून यंदाच्या पावसाळयात बोरी धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात कमी पर्जन्यमान झाल्याने हे धरण पाण्याने भरले नाही. भविष्यात पाणी टंचाईला तोंड दयावे लागणार म्हणून जिल्हा प्रशासनाने पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. शेतीसाठी अवैध पाणी उपसा सुरु असल्याने ते बंद करुन विदयुत पंप जप्तीच्या कारवाईसाठी माजी नगरसेविका छमाबाई धनराज राठोड यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी धाराशिव पाटबंधारे उपविभाग नळदुर्ग कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषणही केले.
नळदुर्ग शहरासह मुर्टा, चिकुंद्रा, अणदुर, तीर्थक्षेत्र तुळजापूरला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी धरणात दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत आहे. उपयुक्त पाणी साठा अत्यंत कमी आहे. यावर्षी बोरीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यंत कमी झाले आहे. भविष्यात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धाराशिव जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर अधिग्रहणाबाबतची स्थिती सिंचन, प्रकल्पातील पाणीसाठा व उपयुक्त पाणीसाठयाची सदयस्थिती याबाबतीत संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश ऑगस्ट महिन्यामध्ये दिले आहेत. त्यावरुन तुळजापूर तहसिलदार यांनी भरारी पथक नियुक्ती केले आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता, महावितरण कंपनीचे शाखा अभियंता, संबंधित गावचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा समावेश आहे. या भरारी पथकात बदली होवून इतरत्र गेलेल्याही कर्मचा-यांचे नावे दिसून येत आहे.
दरम्यान, उपोषणकर्ते माजी छमाबाई राठोड यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारत राष्ट्र समितीने पाठिंबा दिला आहे. पाटबंधारे सिंचन विभागाचे शाखा आभियंता एस सी जगताप, उपविभागीय आभियंता रमेश टोकलवड, मडंळ आधिकारी श्रीमती एस. एन जगताप, महावितरणचे शाखा आभियंता प्रविण गायकवाड आदीनी अवैध पाणी उपसा करणा-या शेतकऱ्यावर कारवाई करुन विद्युत पंप जप्तीची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन श्रीमती राठोड याना दिल्याने त्यानी उपोषण मागे घेतले.
बोरी धरणातुन वर्षाकाठी पुढीलप्रमाणे होतो पाणी पुरवठा
नळदुर्ग कुरनूर मध्यम प्रकल्पातुन वर्षाकाठी पुढीलप्रमाणे पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाते. तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला 1.6197 दशलक्ष घनमीटर, नळदुर्ग शहराला 1.941 दशलक्ष घनमीटर, अणदुर गावाला 1.1295 दशलक्ष घनमीटर, चिकुंद्राला 0.0375 दशलक्ष घनमीटर, मुर्टा गावासाठी 0.041 दशलक्ष घनमीटर असे मिळून महिन्याकाठी 0.34 दलघमी एवढा पाणीपुरवठा केला जातो. दि.6 नोव्हेंबर रोजीची बोरी धरणात पाणी (जिवंत) साठा 7.63 दलघमी म्हणजेच 23.64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.