नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दोन लाख रुपये किमंतीच्या वायरिंगची चोरी , पोलिसांनी घेतले दोघाना ताब्यात

नळदुर्ग,दि.०२

शहरातील उपजिल्हा रुग्णालय कॉर्टर मधील  तब्बल  दोन लाख रुपये किमंतीच्या वायरिंगची अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.


दि. 25.10.2023 रोजी 12.30 ते दि. 31.10.2023 रोजी 10.00 वा. सु. उपजिल्हा रुग्णालय येथील नविन बांधकाम झालेले कॉर्टर मधील 38 कॉर्टरचे मेन वायरिंग 6 एमएम आरआर कंपनीचे वायर तसेच 07 कॉर्टर सर्व वायरिंग 06 एमसीबी बॉक्सची नविन वायरिंग असे एकुण 2,00,000₹ किंमतीचे वायर  अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रशांत गोविंद सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा. कोळसुर कल्याण, ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान उमरगा पोलीस ठाण्याचे पथकाने प्रशांत सुर्यवंशी यांनी पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दिलेल्या माहिती वरुन पोलीस ठाणे नळदुर्ग यांनी लागलीच उपजिल्हा रुग्णालय कॉर्टर नळदुर्ग येथे जावून आरोपी नामे -1) गुरु राम पवार, 2) संजु सोमाजी पवार दोघे रा. विकाळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता नमुद आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर उमरगा पोलीसांनी नमुद आरोपी सह चोरीस गेलेला माल ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करत आहे.
 
Top