संग्रहीत छायाचिञ

तुळजापूर येथे आजपासुन  होणार राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा 

 तुळजापूर ,दि.२१

 एकल महिला संघटनेच्या  वतीने दि 21, व 22 नोव्हेंबर 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल तुळजापूर या ठिकाणी राज्यस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन   पोलिस अधीक्षक , तहसीलदार  यांच्या हस्ते 21/11/2023 मंगळवार रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

एकल महिला संघटना ही महिलांच्या प्रश्नावर काम करत असून 11 तालुक्यातील 19000 महिला सभासद आहेत. तसेच महिलां सोबत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय महिला संपत्ती अधिकार या विषयावर काम करत असताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 


 महिलांनी महिला मंडळात चर्चा करून 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने गावात तालुक्यात कबड्डी खेळायच्या आणि तेव्हा पासून महिला कबड्डी स्पर्धेत भाग घेतात. तसेच मे महिन्यात तालुका स्तरिय कबड्डी घेण्यात आल्या.  यात वय 18 ते 75 वयाच्या देखील महिला कबड्डी खेळल्या व प्रथम महिलांच्या कबड्डी स्पर्धा एकल महिला संघटनाच्या माध्यमातून घेण्यात आल्या. महिलांना देखील मैदानी खेळ खेळायला संधी मिळाली पाहिजे. मनासारखे खेळता यावे आणि त्यातून मनसोक्त आनंद मिळेल. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होईल तसेच महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या मैदानी खेळ खेळायची संधी उपलब्ध होईल. महिलांच्या मागणीनुसार आता राज्यस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये एकूण 65 संघ उतरणार आहेत. तसेच 9 जिल्ह्यातील 15 तालुक्यातून  संघ व इतर महिला ही स्पर्धा पाहण्यासाठी येणार आहेत एकूण 1000 महिलांचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती एकल महिला संघटनेच्या  तुळजापूर तालुका अध्यक्ष पार्वती भगत, उस्मानाबाद च्या अध्यक्ष जमीला तांबोळी, मुखेड तालुका अध्यक्ष माधवी बनसोडे, परांडा तालुका अध्यक्ष मंदा पाटील, चाकूर तालुका अध्यक्ष ठकूबाई अंधारे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष सीताताई सरवदे, बीड तालुका अध्यक्ष शिल्पा पंडित लोहारा तालुका अध्यक्ष रेश्मा कादरी यांनी माहिती दिली आहे.
 
Top