मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची सुनावणी पुढे ढकलून,स्थानिक ठिकाणी सुनावणी घ्या - मनसे

नळदुर्ग ,दि.२२

नळदुर्ग शहरातील शेकडो मतदारांची नावे मतदार यादीतून सामान्य राहिवाशी नाहीत, म्हणून नावे वगळण्यासाठी दिलेल्या अहवालानुसार प्रस्तावीत आहेत,त्यासंदर्भात अनेकांना लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 च्या कलम 22 अंतर्गत/मतदार नोंदणीअधिनियम 1960 नियम 21अ तरतूदीनुसार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार यांनी दि- 23/11/2023 रोजी प्रत्यक्ष हजर राहून राहिवाशी असल्याबाबत पुरावा सादर करून आपले म्हणणे मांडण्या बाबत नोटीसा बजावल्या आहेत.


त्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी याबाबत सहा.मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले  असुन त्यात म्हटले आहे की, एखादा व्यक्ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी राहून नोकरीं करत असेल तर तो सामान्य राहिवाशी नाही का ? बाहेरगावी शिक्षण घेणारे मुलं,मुली हे राहिवाशी नाहीत का?ज्यांचे नावे वगळण्यात आलेल्या यादीत आहेत, यात प्रामुख्याने नव्याने लग्न करून आलेल्या सुना,बाहेरगावी नोकरींसाठी गेलेले मुलं,शिक्षणासाठी बाहेर असलेले मुलं,मुली यांचे मोठ्या प्रमाणात नावे असल्याचे मनसेने म्हटले आहेत, प्रस्तावित दिलेल्या अहवालानुसार हि नावे राहिवाशी नाहीत असे म्हणणे असेल तर मग बाहेरगावी नोकरीं व शिक्षणासाठी असलेले मतदार प्रत्यक्ष शहरात फिरत राहणे म्हणजेच सामान्य: राहिवाशी म्हणायचं का? असा प्रश्न मतदारांना पडत आहे, शिवाय हा अहवाल प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना न विचारता व पाहणी न करता केला आहे असा ठाम विश्वास  कुलकर्णी  यानी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी बहुतांश मतदारांना नोटीस प्राप्त झालेल्या नाहीत,शिवाय सुनावणीसाठी तुळजापूर येथे प्रत्यक्ष हजर राहाताही येणार नाही. कारण नोकरीं,शिक्षण,व व्यवसाया करिता बाहेरगावी असलेल्याना अचानक नोटीस येणे व प्रत्यक्ष हजर रहा म्हणणे उचित होणार नाही. त्यामुळे सुनावणी संदर्भातली तारीख पुढे ढकलण्यात यावी व सुनावणी हि शक्यतो स्थानिक ठिकाणी म्हणजेच नगर परिषद सभागृहात ठेवण्यात यावी अशी मागणी मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी निवेदनात केली आहे.

 
Top