तुळजापूर,दि.२२
एक महिला संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेला तुळजापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.64 संघ स्पर्धेसाठी तुळजापुरात दाखल झाले आहेत. तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
एकल महिला संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेला तुळजापुरात मोठा प्रतिसाद मिळाला 64 संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका पार्वती भगत या होत्या प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अरविंद बोळंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष असिगोड्डीन खतीबना, तानाजी जाधव, गोविंद मस्के, रुक्मिणी नागापुरे महानंदा चव्हाण अनिता नवले यांची उपस्थिती होती.
सदर उद्घाटन कार्यक्रमांमध्ये तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन महिलावर्गाची खेळाप्रती असणारी कटिबद्धता याचे कौतुक केले. जि प माजी सदस्य सक्षणा सलगर यांनी एकल महिला संघटनेच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा प्रेरणा देणारी आहे. महिलावर्ग खेळामध्ये कमी नाही हे दाखवण्यासाठी हे आयोजन अत्यंत यशस्वी झाले आहे असे त्या म्हणाल्या. प्रारंभी रुक्मिणी नागापूरे यांनी प्रास्ताविक करताना ६४ संघांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी अनिता नवले पार्वती भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महानंदा चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये सुरेखा भोसले, उर्मिला महंकराज, आशालता पांडे ,अनिता नवले, सुवर्णा नन्नवरे, कांता शिंदे यांचे योगदान आहे.
सकाळपासून बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या संघांचे नियोजनाप्रमाणे सामने खेळविण्यात आले. एकल महिला संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या महिला कबड्डी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महिलांनी आपल्या कब्बडी खेळाचे प्रदर्शन केले.