नळदुर्ग ,दि.२३

दि.३१ डिसेंबर २०१५ रोजीच्या  शासन निर्णयाप्रामणे राज्यातील  ग्रामपंचायतनी नमुना नंबर ८ हे भांडवली मुल्यावर तयार करुन एप्रिल  २०१७ पासुन आमंलातआणावयाचे आदेशित केले आहे. तथापी आज आखेर तुळजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतने  नमुना नंबर ८ भांडवली  मुल्यावर ( रेडिरेकनरी दराप्रमाणे ) केल्याचे दिसुन येत नाही.याचा आर्थ वरिष्ठ प्रशासकीय  आधिकारी जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहेत.


ज्या आर्थी  रेडिरेकनरी दराप्रामाणे नमुना नंबर ८ ज्या ग्रामपंचायतचे तयार नसुन, आमंलात नाही. त्या ग्रामपंचायतीने केलेली कर वसुली  ही नियमबाह्य आहे. नमुना नं ८ रेडिरेकनर दराप्रमाणे तयार केलेली नसल्याने ग्रामस्थाकडुन करापोटीची रक्कम मनमानीपणे अवाजवी रक्कम वसुल केली जाते. याचा आर्थिक व मानसिक ञास ग्रामस्थाना नाहकच सहन करावा लागत आहे. तसेच ब-याच ग्रामपंचायत मध्ये कर वसुली वर्षानुवर्षे वसुल केल्याचे दिसुन येत नाही. आशा थकबाकीदारावर काय कारवाई केली, जप्ती , किवा चल आचल मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला. याबाबत संबंधित ग्रामपंचायत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष  लागले आहे.
सदर नियमबाह्य  झालेल्या कर, वसुलीवर मुख्य कार्यकारी आधिकारी दोषीवर कारवाई करतील का? की पाठिशी घालतील याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
 
Top