अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा  – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

       जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पंचनामे करणे बाबतचे आदेश निर्गमित

          धाराशिव ,दि.३०  

मागील चार दिवसापासून हवामानात अचानक बदल होवून अवकाळी पावसाने जिल्हयात मोठया प्रमाणात शेती पिकाचे नुकसान केले आहे. खरीप हंगामात पावसाने मोठा खंड घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठया आशेने रब्बी हंगामाची पेरणी केली होती.पिके व्यवस्थीत वाढ आवस्थेत असताना अचानक हवामानात  बदल होवून धाराशिव जिल्हयातील 25 महसुल मंडळामध्ये पावसाने रब्बी हंगामातील    द्राक्ष बाग, पपई, ऊस, कांदा, तूर, ज्वारी  व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. सदर पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणे बाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनास सुचना केल्या आहेत.     

            

धाराशिव जिल्हयातील भुम व परंडा, धाराशिव व तुळजापुर, उमरगा व लोहारा, कळंब व वाशी.  लातूर जिल्हयातील औसा व निलंगा व सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात झालेले नुकसानीचे कृषी विभागामार्फत व जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे करणे बाबत सुचना करण्यात आल्या असून 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या मार्फत जिओ टॅग फोटोसह पंचनामे करुन सदर पंचनामे  सादर करणे बाबत पत्राव्दारे सुचना करण्यात आल्या होत्या  जिल्हाधिकारी, धाराशिव,  जिल्हाधिकारी, लातूर यांनी आज स्थळ पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.   

 
Top