काटीचे तलाठी प्रशांत गुळवे यांची पुन्हा एकदा नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
काटी,दि.३०: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीचे तलाठी श्री प्रशांत प्रभाकर गुळवे यांनी पुन्हा एकदा लक्ष साध्य करीत दि .१९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या नॅशनल रायफल असोसिएशन आयोजित भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या 66 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 2023 साठी १० मीटर एअर पिस्तूल शुटिंग प्रकारात खुल्या गटातून पात्रता मिळवली आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये रिनाउन शूटर उपाधी मिळवत त्यांनी यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 2023 साठी पात्रता मिळवली आहे.
यापूर्वी मागील वर्षी त्यांनी इंदोर,दिल्ली, तिरुअनंतपुरम,भोपाळ, मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत खेळातील सातत्य राखले आहे. त्यांना प्रमोद माळीसर बार्शी, हेमंत जाधवसर सातारा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.त्यांचे निवडी बद्दल तहसिलदार अरविंद बोळंगे , अप्पर तहसिलदार स्वप्नील ढवळे व इतर स्टाफ व तलाठी मंडळ अधिकारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.