मुरुम शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची शिवसेनेची मागणी
मुरुम ,दि.२८
मुरुम शहर व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद कऱावेत जेने करुन या भागातील व शहरातील गोरगरीब जनता आजवर ज्या अश्या विळख्यात अडकून आहे ,असंख्य अडचणीच्या काळात अवैध धंद्यामुळे अनेकाचे आर्थिक नुकसान होत आहे. तात्काळ सर्व अवैध धंदे बंद करावे अन्यथा शिवसेना युवासेना यांच्या वतीने आक्रमक शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे मुरुम पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस उपनिरिक्षक शिंदे यांना देण्यात आले .
यावेळी पोलिस कर्मचारी श्री नागनाथ कटोरे , ,शिवसेना उपतालुका प्रमुख श्री.राजेंद्र शिंदे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुरुम शिवसेना शहर प्रमुख श्री. सुरेश मंगरुळे युवासेना शहर प्रमुख प्रल्हाद (भगत)माळी ,अमृत वरणाळे ,संतोष पिया मुदकण्णा ,मनोज कटारे ,संदिप बाबळसुरे ,आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.