मराठा आरक्षणासाठी वागदरी ग्रा.प. कार्यालयास टाळे ठोको आंदोलन
वागदरी(एस.के.गायकवाड ):
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात वागदरी ता. तुळजापूर येथील सकल मराठा आंदोलकांनी मराठा समाजालाआरक्षण मिळावं या मागणी करिता ग्रामपंचायत कार्यालयास ताळे ठोको आंदोलन केले आहेत .
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत आज सातव्या दिवशीही सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही . अन्न तर सोडा पण पाणीही वर्ज्य करण्याची प्रतिज्ञा करत त्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारला आहे . त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे तरी सरकार त्यांची कसलीही दखल घेत नसल्याने वागदरी येथील मराठा समाज आक्रमक होत आहे . जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाचे ताळे उघडू देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे . तसेच आता यापुढे मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा बांधव साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी बोलताना माहिती दिली .
यावेळी मदन पाटील , दत्ता सुरवसे , किशोर सुरवसे , ज्ञानेश्वर पाटील, आप्पा मिटकर , किशोर धुमाळ , दत्ता पाटील , रवी यादव , पंकज सुरवसे , सवकु यादव , सैरव यादव , बाळू पवार , संकेत सुरवसे , राजेंद्र धुमाळ , भालचंद्र यादव , धरम सुरवसे , गणपती सुरवसे , शिवराज पाटील , यशवंत यादव सह मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते .