तुळजापूर तालुक्यातील वागदरीत विविध विकास कामाचे भूमिपूजन
वागदरी,दि.२७ :एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे बंदिस्त नाली कामाचे लोकार्पण व विविध विकासात्मक कामाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
प्रारंभी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उमाकांत मिटकर व उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी फुलाची उधळण करीत जंगी स्वागत केले .
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दीपावली सणाचे औचित्य साधून गावातील 100 गरजू महिलांना मिटकर परिवाराकडून भाऊबीज भेट म्हणून साडी चोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर , मंत्रालयलीन मुख्य प्रशासकीय अधिकारी उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबईचे संतोष राऊत , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सप्निल लोखंडे,अँड.शरद जाधवर मुख्य जिल्हा सरकारी वकील धाराशिव याची प्रमुख उपस्थिती होती . उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच तेजाबाई मिटकर , उपसरपंच मीनाक्षी बिराजदार , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील , अमोल पवार , गुणाबाई बनसोडे , सुरेखा यादव , मुक्ताबाई बिराजदार , माजी उपसरपंच दत्ता सुरवसे , मदन पाटील , ज्ञानराज मित्र मंडळाचे ज्ञानेश्वर पाटील , किशोर सुरवसे , प्रमोद सोमवंशी , दत्ता सुरवसे , ज्ञानेश्वर परीहार सह ग्रामस्थ महिला युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी केले.