तुगाव येथे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून विवाह सोहळा संपन्न : अनोख्या उपक्रमाचे सर्वञ कौतुक
नळदुर्ग, दि.२६ एस.के.गायकवाड
दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनी उमरगा तालुक्यातील तुगाव येथे आयोजित मंगल परिणय (विवाह सोहळा) संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
की तुगाव ता.उमरगा येथील कै.दयानंद ग्यानबा कांबळे यांचे चिरंजीव फुलचंद दयानंद कांबळे यांचा विवाह अणदूर ता.तुळजापूर येथील कै.विठोबा गोविंद बनसोडे यांची कन्या धनश्री विठोबा बनसोडे यांच्याशी भिमनगर तुगाव ता.उमरगा येथे दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून बौद्ध धम्म पध्दतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी नव वधुवरांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या ७४ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.बुद्ध वंदना,विधायक पंचशील, बुद्ध पुजा, भिमस्मरण ,भिमस्तुती, त्रिरत्न वंदना, गाथा घेऊन शेवटी जयमंगल अठ्ठगाथे नंतर उपस्थित जन समुदायानी नव वधूवरावर फुलांचा वर्षाव करून त्यांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन धम्म संस्कार विधिकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते एस.के.गायकवाड यांनी केले.या मंगल प्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,धम्म मित्र हरिदास कांबळे,रिपाइं(आठवले)
तुळजापूर तालुका संघटक सुरेश लोंढे, जेष्ठ कार्यकर्ते मधुकर कांबळे,ग्रा प.सदस्या अनुशया प्रबोध कांबळे ,शामराव कांबळे, मनोहर बनसोडे, भानुदास लोंढे, भास्कर लोखंडे,सह आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ,महिला युवक उपस्थित होते.
सामुदायिकरित्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या अनोख्या विवाह सोहळ्याचे उपस्थितानी कौतुक केले.