परंपरा जपणाऱ्या महिलांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
नळदुर्ग,दि.२६ : नेताजी महाबोले
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था व ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बोरामणी यांच्या संयुक्त विद्यमाने इटकळ येथे जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणाऱ्या आधुनिक बहिणाबाईंचा सन्मान कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा. मधुकररावजी चव्हाण साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर यांच्यासह जेष्ठ साहित्यिक कवी विचारवंत योगीराज माने शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सरपंच रामचंद्र आलुरे जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ आस्मा नदाफ सेवानिवृत्त प्राचार्य संगमेश्वर जळकोटे नळदुर्ग येथील कवयित्री कविता पुदाले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणाऱ्या महिलांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.