सागर जाधवर यांची कमांड (ऊधमपुर) येथे व्हाॅलिबॉल साठी निवड

अणदूर, दि.१८

धोत्रे (ता. बार्शी) या गावचे सुपुत्र, राजस्थान येथे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले सागर नानासाहेब जाधवर यांची कमांड (ऊधमपुर) येथे होणाऱ्या व्हाॅलिबॉल स्पर्धेसाठी साठी निवड झाली आहे.‌ 

सागर जाधवर  यांच्या या निवडी बद्दल धोत्रे गावात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच अणदूर येथील अक्षय अनिल घुगे यांच्या कुटुंबीयांचा वतीने हार, फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक दत्तात्रय घुगे, माजी सैनिक अनिल घुगे, प्रकाश घुगे, अभिषेक सुर्यवंशी, तसेच अक्षय अनिल घुगे मित्र परिवार उपस्थित होता.
 
Top