नळदुर्गचा किल्ला पर्यटकांना भुरळ घालणारा
विद्यार्थी जाणून घेत आहेत नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास
नळदुर्ग,दि.१८
विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती व्हावी व आवड निर्माण होवून त्यांच्यामध्ये इतिहास संशोधन वृत्ती निर्माण होण्याच्या हेतूने शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आभ्यास सहली नळदुर्ग किल्ल्यात येत आहेत.
नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यास पर्यटक , शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी इतिहास प्रेमी नागरिक आदि भेट देवून उपली बुरुज, पाणी महाल, बारादरी, परंडा बुरुज, नवबुरुज, रंगमहाल, मुन्सीफ कोर्ट, अंबरखाना आदीसह किल्ल्यातील विविध वास्तूंची पाहणी करुन युनिटी कंपनीने केलेल्या सुशोभिकरणासह ऐतिहासिक वास्तुची माहिती जाणुन घेत आहेत. त्याचबरोबर बोटींगचाही मनमुराद आनंद लुटतात.
गड किल्ल्याच्या तुलनेत नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला व प्राचीन वास्तूची योग्य प्रकारे जतन करुन आकर्षक सुशोभिकरणामुळे पर्यटकांना हा किल्ला भुरळ घालत आहे. शासनाकडून सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी , संचालक जयधवल करमरकर, संचालिका वैशाली जैन यानी
संगोपनार्थ घेतलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याचे रुपडे बदलले आहे. त्यामुळे किल्ल्यास भेट देणा-या विद्यार्थी, इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटकांचा ओघ वाढताना दिसुन येत आहे.