नळदुर्ग शहरात भिमराव आंबेडकर यांचे जंगी स्वागत

नळदुर्ग ,दि. १७: एस.के.गायकवाड

ऐतिहासिक  नळदुर्ग  शहरात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचे नळदुर्ग शहरात.फटाक्याची अतिषबाजी, फुलाची उधळण करीत जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी नळदुर्ग येथील बौध्दाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यानी भरगच्च तयारी केली होती.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचे नळदुर्ग शहरात प्रथमच आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून शाल पुष्पहार देवून भिमराव आंबेडकर  तुम आगे बडो, हम तुमारे साथ है ,भारतीय बौद्ध महासभेचा विजय आसो,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय आसो, अशा जोरदार घोषणाबाजीने  स्वागत करण्यात आले.


यावेळी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इग्लीश मेडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे रिपाइंचे उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा समन्वय एस.के.गायकवाड,अरुण लोखंडे, परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, केंद्रीय शिक्षक बाळासाहेब बागडे आदीसह परिसरातील बौद्ध उपासकानी  गर्दी केली होती . यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे,योगेश सुरवसे यांच्यासह अनेकानी भिमराव आंबेडकर यांना मानवंदना दिली.याप्रसंगी कोरेगाव भीमा प्रकरणात बौद्ध तरूणांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन  देण्यात आले. परंडा येथे बौद्ध संस्काराचे महाविहार बनविण्यात आले .त्या बौध्द विहाराच्या  लोकार्पण सोहळ्या निमित्ताने नळदुर्ग मार्गे ते परंडा येथे जात असताना त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन नळदुर्ग येथे करण्यात आले होते.
 

यानिमित्ताने उपासकाना प्रथमच  भिमराव आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठीचा योग आला म्हणून नागरीकांना  आनंद झाला होता. यावेळी शहरातील सचिन बनसोडे , राजेश बनसोडे , अमर बनसोडे ,तुषार गायकवाड , सिद्धांत बनसोडे ,शाम नागिले , गोविंद भंडारेसह उपासक मोठया संख्येने उपस्थित होते .
 
Top