पत्रकार अयुब शेख यांचा गौरव यांचा मराठवाडा युवा पुरस्काराने गौरव
नळदुर्ग , दि. २३
पत्रकार आयुब शेख यांना मराठवाडा युवा गौरव पुरस्काराने दि 22 रोजी नळदुर्ग येथील आयोजित सोहळ्यात जिल्हाधिकारी डाँ सचिन ओंबासे , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला.
ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात मराठवाडा युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाँ सचिन ओंबासे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे, तहसीलदार अरविंद बोळंगे,सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,डॉ. सुरेश वाघमारे, सरपंच रामचंद्र अलुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार अयुब शेख हे आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत.वंचित, पिडीत आणि शोषिताना न्याय मिळवून देण्यात प्रयत्नशिल आहेत.शेख यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.