नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची  मनसेची मागणी


नळदुर्ग,दि.२१
नळदुर्ग शहरात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यास शेती उद्योगाला चालना मिळेल, शिवाय शेतकऱ्यांना मोठ्या सोयीचे होईल, शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्ती राहतील,त्यामुळे नळदुर्ग सारख्या मोठ्या शहरात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असणे गरजेचे  असल्याची  मागणी राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे केली आहे,

 नळदुर्ग शहराची लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास असून परिसरातील रोजचा संपर्क असलेल्या १००  गावाची लोकसंख्या जवळपास दीड-दोन लाख असून,यातील बहुतांश लोकांचा प्रमुख उद्योग हा शेतीच आहे. 

नळदुर्ग हे मध्यवर्ती ठिकाण असून दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले हे  शहर आहे,परिसरातील 70 गावाचे केंद्रस्थान आहे, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोलापूर,तुळजापूर,लातूर आदी ठिकाणी  वाहन करून पदरमोड करत मालाची विक्री करावी लागत आहे. कष्ट करून घाम गाळून शेतात पीकविलेला माल कधी कधी कवडीमोल भावाने विकावं लागत आहे. 

नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यास शेती उद्योगाला चालना मिळेल, शिवाय शेतकऱ्यांना मोठ्या सोयीचे होईल,शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्ती राहतील,त्यामुळे नळदुर्ग सारख्या मोठ्या शहरात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असणे गरजेचे  असल्याची  मागणी राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे केली आहे,


निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड आदींच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top