सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन च्या परीक्षेत ओमकार माळकुंजे चे यश
वागदरी ,दि.०६ : किशोर धुमाळ
जागतिक स्तरावर विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता चाचणी घेणाऱ्या एसओएफ परिक्षेत उमरगा येथील श्री श्री रविशंकर इंग्लिश विद्यालयातील विद्यार्थी ओमकार सुधीर माळकुंजे ई.४ थी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
मूळ गाव कुंनसावळी ता. तुळजापूर येथील रहिवाशी असलेले सुधीर माळकुंजे हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी उमरगा येथे राहायला गेले व आपल्या मुलांना त्यांनी श्री श्री रविशंकर इंग्लिश विद्यालायात प्रवेश दिला. त्यांचा मुलगा अत्यंत हुशार आहे. हे पाहून त्यांच्या गुरूजींनी त्याला जागतिक स्तरावर होणाऱ्या बुद्धिमत्ता प्रथम चाचणीसाठी परीक्षेला बसविले व त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ती परीक्षा पास केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तो ८६६ रँक ला आला आहे तर रिजनल स्तरावर तो ६७५ रँक आणि झोनल स्तरावर ४९६ रँक घेवून विद्यालयात तो प्रथम क्रमांक मिळविला आहे .त्याचा निकाल www.sofworld.org या साईट वर पाहता येतो. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्याची आई कविता माळकुंजे यांनी घरी त्याचा अभ्यास करून घेतला आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सगर हिरेमठ, सर्व शिक्षक, परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, एस. के.गायकवाड,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते भैरवनाथ कानडे यांनी अभिनंदन केले आहे.