पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
नळदुर्ग ,दि.०६
शहरातील शिवलिंगेश्वर हिरेमठ येथे राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध ठिकाणचे भक्त उपस्थित होते.
राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त दि.२८ नोव्हेंबर पासून आध्यात्मिक प्रवचन व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मंगळवार दि.पाच रोजी धर्मसभा, शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक व पत्रकारांचा महास्वामींच्या हस्ते सन्मानपत्र, श्रीफळ, खादीची टोपी ,व शाल देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातून महाराजांचे भक्त पुण्यतिथीनिमित्त नळदुर्ग शिवलिंगेश्वर मठात दर्शनासाठी दाखल झाले होते. नळदुर्गच्या दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर महास्वामींनी गदगी येथे समाधी घेतली असून या ठिकाणी वर्षभर अनेक भक्त समाधीच्या दर्शनासाठी नेहमीच येत असतात.
धर्मसभेस जयशांतलिंग महास्वामी ( हिरेनागाव), राजशेखर महास्वामी (नंदगाव), शिवयोगी शिवाचार्य महास्वामी (अणदुर), शंकर राजेंद्र महास्वामी (अमिनगड), शिवलिंग महास्वामी (मुनवळ्ळी) बसवलिंग महास्वामी अक्कलकोट, विरंतेश्वर महास्वामी केसरजळगा, व महाराजांचे वंशज सध्याचे मठाधिपती बसवेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते. धर्मसभेनंतर चंद्रशेखर माळगी गडहिंगलज यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी नळदुर्गसह परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसवराज धरणे, दयानंद स्वामी, भिमाशंकर बताले, सिध्दु मानशेट्टी, महालिंग स्वामी, आप्पू स्वामी, राजकुमार पिच्छे, श्रीनिवास मुळे, सुभाष कोरे, खंडाप्पा कोरे , मल्लिनाथ माळगे, पप्पू पाटील, शिवय्या स्वामी, बंडू कसेकर, , ज्योतीर्लिंग बचाटे यांच्यासह शहरातील भक्तांनी परिश्रम घेतले. सुञसंचालन दत्ताञ्य कोरे , विनायक अहंकारी यांनी केले.