सांगवी बू पुलाच्या दुभाजकाला भगदाड ;राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
या भागदाडात एकाचा मृत्यू तर कित्येजण जखमी
गेल्या 6 महिन्यापुर्वीपासुनची अक्कलकोट- वागदरी रस्त्याची खड्डे बुजवाण्याची मागणी ,मलम न लावता पट्टी केल्याने अक्कलकोट वागदरी रस्ता पुन्हा खड्डेमय
प्रविणकुमार बाबर /सांगवी बु
अक्कलकोट दि :- 01 तालुक्यातील वागदरी रस्त्ता उखडून खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेष धक्कदायक बाबा म्हणजे सांगवी बु येथील पुलाच्या दुभाजकाला भला मोठा भगदाड पडला असून, हा पूल संपताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे पडलेले लांबून वाहन चालकाच्या निदर्शनास येत नाहीत. पण गाडी जवळ जाताच हे खड्डे दिसतात अचानक पणे गाडी कंट्रोल करणे हे वाहन चालकांना धोक्याचे ठरत असून, दोन दिवसापूर्वी दुचाकीस्वारला हा खडा न दिसल्याने गाडी खड्ड्यात गेली व हे दोघे पडून गंभीर जखमी झाले. दोन दिवसाच्या उपचारा दरम्यान त्या जखमी महिलेचे काल निधन झाले. या मृत्यूला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर गुन्हा करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांतून होत आहे.
अक्कलकोट वागदरी हा रस्ता सा बा विभागाच्या आखतरीत होता .पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्याकडे हस्तातरीत करण्यात आला आहे. या विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यानी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत असून, आणखीन किती बळी गेल्यावर हा रस्ता होणार आहे...? असा संतप्त सवाल नागरिकांतुन केला जात आहे.
अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग हा रस्ता कर्नाटक व मराठावाडा यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता समजला जातो. या रस्त्यावर सर्वात जास्त रहदारी असते. सांगवी बु पुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यात आत्तपर्यंत 30 ते 40 जण पडून गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्यातच एका महिलेचे मृत्यू झाले आहे. येत्या आठवड्याभरात हा अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय महामार्गची दुरुस्ती करावी,अन्यथा नागरिकांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचाइशारा दिला आहे.