एड्स रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती आवश्यक

नळदुर्ग ,दि.०१

एड्ससारख्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी येथे केले. 

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा  राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या एड्स रोग नियंत्रण व प्रतिबंध जनजागृती उपक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, प्रा. चांदसाब कुरेशी, कार्यालयीन अधीक्षक श्री. धनंजय पाटील, प्रा. पांडुरंग पोळे, डॉ. दीपक जगदाळे, राष्ट्रीय सेवा विभागाचे कार्यक्रमधिकारी प्रा.बाबासाहेब सावते, प्रा. दादासाहेब जाधव, डॉ. युवराज पाटील,  डॉ. अतिश तिडके व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एड्स रोग नियंत्रण व प्रतिबंध जनजागृती शपथ घेण्यात आली.

 
Top