व्हॉइस थेरपीस्ट सोनाली लोहार

औरंगाबाद विभागाची आवाजाची कार्यशाळा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात

उमरगा,दि.२८

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत औरंगाबाद विभागाशी संलग्न  सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी आवाजाच्या कार्यशाळेचे आयोजन करियर कट्टा सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, धाराशिव येथे दि. 29 डिसेंबर 2023,  वेळ दुपारी 11 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. 


प्राध्यापकांना त्यांच्या सेवेमध्ये अध्ययन करत असताना आपल्या आवाजातील चढ उतारा बरोबरच आरोग्य कसे राहावे याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन व्हॉइस थेरपीस्ट सोनाली लोहार यांचे होणार आहे.

 तरी औरंगाबाद विभागांतर्गत सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या कार्यशाळेत महाविद्यालयात सहभाग घ्यावा असे आव्हान महाविद्यालय प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव आणि उपप्राचार्य व करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. संजय अस्वले,  महाविद्यालयीन समन्वयक डॉ. एस पी पसरकले, डॉ ए के कटके आदींनी केले आहे
 
Top