नव्या जुन्याचा मेळ साधत भारतीय  जनता  पार्टीची लोहारा तालुका कार्यकारिणी जाहीर ;  ४२ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर


लोहारा , दि.२८

      नव्या जुन्याचा मेळ साधत भारतीय  जनता  पार्टीची लोहारा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन ४२ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपचे नेते व  आमदार राणाजगजितसिंह पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील , 
माजी आमदार सुजितसिंह ठाकुर,  यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांनी  लोहारा तालुका भाजपाची नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. नुतन कार्यकारिणीत ७ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस तर ७ चिटणीस यांचा समावेश आहे.


भाजपा नुतन कार्यकारणी खालीलप्रमाणे

   नूतन कार्यकारणीत उपाध्यक्षपदी संपत देवकर, दिलीप पवार, प्रवीण चव्हाण, भरत जाधव, शिवाजी दंडगुले, बालासिंग बायस, दत्ता कडबाने, तालुका सरचिटणीसपदी दगडू तिघाडे, विष्णू लोहार, तर इक्बाल मुल्ला यांची सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी युवराज जाधव, सुरेंद्र काळाप्पा, अनिल आतनुरे, बसवराज कोंडे, उमेश सोनवणे, गोविंद यादव, किशोरसिंह राजपुत यांच्याकडे चिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी श्रीकांत सुर्यवंशी तर प्रसिद्धी प्रमुखपदी निलेश बचाटे, आयटी व सोशल मीडिया प्रमुख पदी जयेश सुर्यवंशी,  भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी विरेंद्र पवार, लोहारा शहराध्यक्षपदी आशपाक सुंबेकर, महिला मोर्चा अध्यक्षपदी, सौ संजीवनी बुर्ले, सरचिटणीसपदी सुजाता थोरात, किसान मोर्चा अध्यक्षपदी बालाजी चव्हाण, सरचिटणीस आबा साळुंके, एससी मोर्चा अध्यक्षपदी नंदन थोरात, सरचिटणीस मिलींद सोनकांबळे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी बालाजी सोनटक्के,  सरचिटणीसपदी युवराज लाळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी योगिराज कारभारी, वकील आघाडी पदी अॅड.देविदास जाधव, सहकार आघाडीपदी गोवर्धन मुसांडे, व्यापार आघाडीपदी मल्लीनाथ फावडे, ग्रामविकास आघाडीपदी प्रशांत माळवदकर, भटके विमुक्त आघाडीपदी बाबुसिंग राठोड, बुध्दीजिवी सेल अध्यक्षपदी उदय कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्षपदी कल्याण ढगे, सरचिटणीसपदी विजय महानुर, माजी सैनिक गहीनाथ कागे, आयुष्यमान भारत सेल बाळु देवकर, यांची निवड करण्यात आली आहे. यांच्यासह भाजपा विविध आघाडी व मोर्चाच्या ४२ पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. सर्व नुतन पदाधिकार्‍यांना लवकरच भाजपाच्या कार्यक्रमात नियुक्तीपत्रे प्रदान केले जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष श्री. हत्तरगे यांनी  म्हंटले आहे.
 
Top