श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित जंगी कुस्ती स्पर्धेच्या कुस्ती आखाड्याचे पुजन
नळदुर्ग, दि.३१: विलास येडगे
नळदुर्ग येथील ऐतिहासिक व प्राचिन काळापासुन चालत आलेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त याही वर्षी दि.२६ जानेवारी रोजी जंगी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन त्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. रविवार दि.३१ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र मैलारपुर येथील कुस्ती आखाड्याचे पुजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग (मैलारपुर) येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक श्री खंडोबा देवाची यात्रा यावर्षी दि.२४,२५ व २६ जानेवारी २०२४ रोजी भरत आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील लाखो भाविक येतात. यावर्षी २४ जानेवारी रोजी यात्रेस प्रारंभ होणार असुन यात्रेच मुख्य दिवस २५ जानेवारी हा आहे. दि.२६ जानेवारी २०२४ रोजी याठिकाणी श्री खंडोबा यात्रेनिमित्त श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती नळदुर्गच्या वतीने जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सन २०१७ पासुन कोरोनाचा दोन वर्षांचा कालावधी सोडला तर प्रत्येक वर्षी श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती नळदुर्गच्या वतीने याठिकाणी जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त सहाय्यक परीवहन अधिकारी नंदकुमार डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष रणजितसिंह ठाकुर, कार्याध्यक्ष विनायक (बंडू) पुदाले, उपाध्यक्ष अनिल पुदाले,कोषाध्यक्ष संजय मोरे सदस्य सुहास येडगे,सुधाकर चव्हाण, रमेश जाधव, पद्माकर घोडके, तानाजी जाधव,शिवाजी वऱ्हाडे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी ही कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.
आतापर्यंत या आखाड्यामध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांनी हजेरी लावली आहे. अनेक नामांकीत पैलवानांनी या आखाड्यात येऊन कुस्ती खेळली आहे. ही स्पर्धा जंगी व्हावे याठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नामांकीत पैलवान यावेत यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांचेही मोठे योगदान लाभले आहे.
यावर्षीही श्री खंडोबा यात्रेनिमित्त दि.२६ जानेवारी रोजी श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती नळदुर्गच्या वतीने भव्य व लाखो रुपये बक्षिसांच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने या कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. दि.३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. श्री क्षेत्र मैलारपुर येथील भव्य कुस्ती आखाड्याचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. प्रारंभी सेवानिवृत्त सहाय्यक परीवहन अधिकारी नंदकुमार डुकरे यांच्या हस्ते आखाड्याचे पुजन होऊन व श्रीफळ वाढवुन या कुस्ती स्पर्धेच्या तयारीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शफीभाई शेख,माजी उपनगराध्यक्ष संजय मोरे,माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, विनायक अहंकारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, मनसेचे जिल्हा सचिव जोतिबा येडगे, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, शहर भाजप अध्यक्ष धिमाजी घुगे, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद पुदाले, भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके,पप्पु पाटील, मारुती घोडके, बलदेवसिंग ठाकुर,पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, लतीफ शेख, उत्तम बणजगोळे, अजित चव्हाण, आयुब शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, काँग्रेसचे पांडुरंग पुदाले,अजय दासकर, अतुल हजारे ,अमर भाळे,न्हावी समाजाचे राजेंद्र महाबोले, संदीप सुरवसे, समीर मोरे, खालेद इनामदार यांच्यासह कुस्ती प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.