नळदुर्गच्या भुईकोट किल्याची हुबेहूब प्रतिकृती निर्माण करणा-या  जनसेवक युवक मंडळाच्या सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने केला गौरव 


नळदुर्ग,दि.३१ : 

कोल्हापूर जिल्हातील इचलकरंजीच्या जनसेवक युवक मंडळाच्या सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी  २१७ किलो वजनाची ऐतिहासिक  नळदुर्गच्या भुईकोट किल्याची हुबेहूब प्रतिकृती निर्माण केल्याने त्यांचा  सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने गौरव केला आहे.


2023 च्या दिवाळी मध्ये कोल्हापूर जिल्हातील इचलकरंजी येथील जनसेवक युवक मंडळ 217 वजनात या मंडळाने नळदुर्गच्या किल्याची हुबेहूब प्रतिकृती निर्माण केली होती.अत्यंत सुंदर असा नळदुर्गचा किल्ला बनवला होता. विशेष म्हणजे हा किल्ला बनवणारे सगळे युवक हे कामगार आहेत. दिवसभर काम करुन रात्री किल्ला बनवणे असा त्यांचा दिनक्रम होता..या मंडळात हिंदू मुस्लिम एकत्र मिळून गणेशउत्सव साजरा करतात. हा किल्ला बनवणाऱ्या मंडळाच्या एकाही सदस्यांनी आजपर्यंत नळदुर्गचा किल्ला कधीही पहिला नाही, फक्त माहिती गोळा करुन त्यांनी हा किल्ला बनवला होता.

यामध्ये योगेश भोईटे, ऋषीं भोईटे,अमीर मुलानी, सूरज कोटकर, आकाश वरपे,यश हवळ, सलमान पठाण, सोहेल इचलकरंजीकर, शाहरुख मुलाणी,सलमान मुलाणी, कुबेर कट्टीमणी,आकाश कोटकर, साहिल नांदणीवाले, अथर्व लायकर,सुहास मराठे, कयूम इचलकरंजीकर असे सर्व जातीधर्माचे युवक किल्ला बनवण्यात अग्रेसर होते. 

 युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांनी याबाबत माहिती गोळा करण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार युनिटीचे जनसंपर्क अधीकारी व नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी या तरुणांचा पत्ता शोधून काढला. त्यावर लगेच विलंब न करता कफिल मौलवी जयधवल करकमकर आणि वैशालीताई जैन यांनी युनिटीकडून या मंडळाला 5 हजार रुपयेचे बक्षीस जाहीर करुन मंडळाचा सन्मानही जाहीर केला.

  विनायक अहंकारी यांनी  इचलकरंजीला जावून या मंडळाची भेट घेवून त्यांचा सन्मान केला.यावेळी या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सन्मानपत्र व 5 हजार रुपये दिले. जनसेवक मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
 
 एवढ्या लांब जावून त्या मंडळाचे कौतुक करणाऱ्या युनिटीचे मुख्य संचालक कफिल मौलवी यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे. अशा कलेला प्रोत्साहन देणे सुद्धा  महत्वाचे आहे.  याप्रसंगी नळदुर्ग  प्रमोद कुलकर्णी, सचिन भूमकर,अजित भूमकर,अजय देशपांडे, ज्ञानेश्वर केसकर, सुदर्शन पुराणिक , संकेत भूमकर आदी उपस्थित होते.
 
Top