पाटबंधारे कार्यालयाची  थकबाकी सुमारे पावणे सात कोटी रूपये , पाटबंधारे कार्यालयाची आवस्था बिकट

नळदुर्ग, दि.०८

नळदुर्ग कुरनूर मध्यम प्रकल्पातुन तीर्थ क्षेत्र तुळजापूर ,नळदुर्गशहर , अणदुर, चिंकुद्रा, मुर्टा आदी गावची 
 पिण्याच्या पाण्याची तहान  गरज भागविली जाते. गेल्या अनेक वर्षापासुन धाराशिव पाटबंधारे उपविभाग कार्यालय क्र. ७ नळदुर्ग कार्यालयाची पाणी पट्टी येणे थकबाकी सुमारे पावणे सात कोटी रूपये असून शेतक-याकडून अंदाजे साडेचार कोटी, तुळजाभवानी  साखर कारखान्याची सन २०१५ पर्यंत एक कोटी ४९ लाख ८५ हजार रूपये थकबाकी येणे आहे. तसेच दोन नगरपालिका व तीन ग्राम पंचायतीकडूनही कुरनूर मध्यम प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी उपसा केला जातो.


 दोन नगरपालिका व तीन ग्रामपंचायत मिळून तब्बल पाऊण कोटी (७५ लाख) रूपये पिण्याच्या पाण्याची थकबाकी आहे. पाटबंधारे कार्यालय नळदुर्ग शाखेकडून वारंवार नोटीस बजावुनही ही थकबाकी जमा केली जात नाही. यामुळे पाटबंधारे कार्यालयाची आवस्थाही बिकट झाली आहे.

  बिगर सिंचन मध्ये तुळजापूर नगरपालिका ४३ लाख ४८ हजार, अणदुर ग्रामपंचायत २२ लाख १३ हजार,नळदुर्ग नगरपालिका ६ लाख ३२ हजार, चिंकुद्रा ग्रामपंचायत ३ लाख १६ हजार, मुर्टा ग्रामपंचायत १ लाख ३८ हजार एवढी पाणी पट्टी थकबाकी आहे.
बोरी धरणातुन वर्षाकाठी पुढीलप्रमाणे होतो पाणी पुरवठा 

नळदुर्ग कुरनूर मध्यम प्रकल्पातुन (बोरी धरण) वर्षाकाठी पुढीलप्रमाणे पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाते.  तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला १.६१९७  दशलक्ष घनमीटर, नळदुर्ग शहराला १.९४१  दशलक्ष घनमीटर, अणदुर गावाला १.१२९५  दशलक्ष घनमीटर, चिकुंद्राला ०.०३७५  दशलक्ष घनमीटर, मुर्टा गावासाठी ०.०४१  दशलक्ष घनमीटर असे मिळून महिन्याकाठी ०.३४ दलघमी एवढा पाणीपुरवठा केला जातो. सध्या बोरी धरणात पाणी (जिवंत) साठा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणाची लांबी १ हजार १्२ मीटर तर उंची २२ .७० मीटर आहे या धरणाचे लाभक्षेत्र ६ हजार २८७ हेक्टर तर लागवडी योग्य क्षेत्र ६ हजार ४७७ हेक्टर आहे, आोलिताखालील क्षेत्र ३ हजार ६४४ हेक्टर आहे तर ४ हजार शेतकरी या पाण्याचा आपल्या शेतीसाठी उपयोग करतात तर नळदुर्ग, अणदूर सराटी, वागदरी, फुलवाडी, गुजणूर, शहापूर, चिवरी, खुदावाडी आदी गावातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे रब्बी, उन्हाळी पिकांसाठी पाणी देण्यात येते.
 
Top