नळदुर्ग, दि.१०

राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी 
नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यास भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली.


  अप्पर पोलिस महासंचालक  कृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्ण प्रकाश यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली. किल्ल्यातील विविध ऐतिहासिक वास्तु ,  युनिटी कंपनीने किल्ल्याचे बदललेले रुपडे ,इतिहास प्रसिद्ध तोफ याची पाहणी करुन माहिती जाणुन घेतली.


यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, तुळजापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, उमरग्याचे  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रमेश बरकते,  नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, आदीजन उपस्थित होते.अप्पर पोलीस महासंचालक  कृष्ण प्रकाश यांचे किल्ल्यात आगमन होताच युनिटी 
मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी यांनी त्यांचे सत्कार केले. यावेळी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काजी,  विनायक अहंकारी यांच्यासह अदिजण  उपस्थित होते.
 
Top