विकसित भारत संकल्प यात्रेचे वागदरी येथे उस्फुर्त स्वागत

वागदरी,दि..१० :एस.के.गायकवाड

 विकसित भारत संकल्प यात्रेचे वागदरी ता.तुळजापूर येथे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने उस्फुर्त पणे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने राबविलेल्या आणि राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले.
 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अँड, दिपक  अलुरे, भाजपा इटकळ गट प्रमुख आरविंद पाटील, विवेकानंद मिलगीरे,भिवा इंगोले,प.स.विस्तार अधिकारी ए.सी. कावळे, डॉ. यशवंत नरवडे,आरोग्य सेवक आर.बी. गोबाळे,आर.बी. हावलदार आदीनी शासनाच्या विविध योजना बाबत उपस्थित ग्रामस्थांसी चर्चा केली.

याप्रसंगी सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर,उपसरपंच मिनाक्षी बिराजदार, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार,अंकोल वाघमारे, मुक्ताबाई बिराजदार, सुरेखा यादव, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर,सहशिक्षक तानाजी लोहार, किशोर धुमाळ,रामसिंग परिहार, आशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार,सिआरपी विद्या बिराजदार,कोमल झेंडारे आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top