विकसित भारत संकल्प यात्रा बोळेगावत पोहंचली
वागदरी, दि.२० :एस.के.गायकवाड
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व आंमलबजानी करून देशातील सर्व गांवे वाडी वस्तीतील उपेक्षित लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेवटच्या सीमेवर तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकसित भारत संकल्पन यात्रा पोहंचली .
याप्रसंगी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, आयुष्यमान भारत योजना,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती योजना,विश्वकर्मा योजना सह विविध योजनांची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी सरपंच विलास पाटील, ग्रा.प.सदस्य अंकुश रुपनूर,सुनील सुर्यवंशी, नागरबाई जाधव, सामाजिक कार्यकर्ते अंगद जाधव, संगीता सुरवसे, सखुबाई सुरवसे,अशा कार्यकर्ती अंजली रुपनूर, जगदेवी स्वामी, शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक,ग्रामसेवक, ग्रा.प. कर्मचारी, आरोग्य कर्मचारीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.