वागदरीत यशवंत यादव यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

वागदरी, दि.२० :एस.के.गायकवाड

वागदरी ता.तुळजापूर येथील  यशवंत पांडुरंग यादव हे केंद्र सरकारच्या डाक विभागातून पोष्टमन म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल वागदरी येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

   यशवंत यादव यांनी नळदुर्ग येथील पोस्ट ऑफिस अंतर्गत तब्बल ४४ वर्षे वागदरीचे पोस्टमन म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे  सेवा केली. त्यांच्यामुळे वागदरी गावात स्वतंत्र पोस्ट ऑफिस निर्माण झाले. पोस्ट ऑफिस मार्फत केंद्र सरकारच्या अनेक योजनेचा लाभ येथील ग्रामस्थाना  त्यांनी मिळवून दिला. सोशल मीडियाची सुविधा निर्माण होण्या आगोदर सायंकाळी पाच सहा वाजण्या दरम्यान पोस्टमन यशवंत यादव गावात गल्लोगल्ली हातात पत्रांचा गठ्ठा घेऊन फिराया लागले की प्रत्येकजन विचारत असत की आमचे पत्र आले का ? आमची मनीआर्डर आली का ? प्रत्येकाशी संयमाने उत्तर देत त्यांनी जनतेची सेवा केली.


पोस्टात शेकडो ग्राहकांच्या आरडी, एफडी सारखे बचत खाते काढून लोकांना बचतीची सवय लावली.वेळेत सेवा देवून पोस्ट खात्याची विश्वासार्हता गावात निर्माण केली. 
 तब्बल ४४ वर्षे पोस्ट खात्यात सेवाकरुन  दी.१८ डिसेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले.
  

त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने वागदरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा  सत्कार करून पुढील जीवनकार्यास त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी ह.भ.प.सुरेशसिंग परिहार, प्रवचनकार ह.भ.प.राजकुमार पाटील, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरूजी,महादेव बिरादार, ज्ञानेश्वर पाटील, मदन पाटील, भालचंद्र यादव, दत्ता सुरवसे,बालाजी बिराजदार, किशोर सुरवसे,चंद्रकांत वाघमारे,बाळू पवार, शिवाजी माडजे,रामसिंग परिहार, जितेंद्र पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top