तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमृता चव्हाण यांची बिनविरोध निवड 


नळदुर्ग,दि.१८ 

तुळजापूर तालुक्यातील स्मार्ट ग्राम आलियाबाद ग्रामपंचायतींची सार्वत्रनिक निवडणूक पार पडली यात जिल्हा परिषदेचे सदस्य  प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आठ पैकी सात जागा जिंकून  विजय मिळवला होता.

 उपसरपंचाची निवड सरपंच सुर्यकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आगतराव कावळे यांच्या उपस्थितीत पार पडली.,यावेळी उपसरपंच  पदासाठी अमृता भिमा चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध जाहीर करण्यात आले.


यावेळी माजी सभापती प्रकाश चव्हाण,  निवृत्त नायब तहसीलदार माणिक चव्हाण, माजी सरपंच ज्योतीका चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत राठोड, ग्रामपंचायत सदस्य शांताबाई राठोड, कमळाबाई राठोड, कांताबाई पवार, चांगुणाबाई जाधव,मनोज चव्हाण, रेखा चव्हाण, शांताबाई चव्हाण,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, अँड बाबुराव पवार,  नेमिनाथ चव्हाण  महादेव राठोड, शिवाजी चव्हाण , माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, व्यंकट राठोड, सिद्राम पवार, माणिक राठोड ,यशवंत राठोड, विठ्ठल जाधव, बाबुराव चव्हाण , प्रशांत चव्हाण,किरण चव्हाण, ऋषी चव्हाण, हरिदास राठोड,रेखु राठोड, यशवंत राठोड , देविदास चव्हाण, सुभाष चव्हाण, अनिल चव्हाण, संदीप राठोड, पप्पू चव्हाण, राहुल चव्हाण ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे आदिजण उपस्थित होते. यावेळी पेढे वाटून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
 
Top