मनसेने मागणी केलेल्या स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी संबंधित विभागाला अहवाल देण्याची सूचना
नळदुर्ग ,दि.१०
नळदुर्ग शहरात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली होती. त्यावरुन धाराशिव जिल्हा उपनिबंधक यानी वस्तुस्थितीसह आभिप्राय सादर करण्याचे आदेश तुळजापूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेस दिले आहे.
मनसेने या निवेदनाची एक प्रत जिल्हा उपनिबंधक यांनाही दिली होती. त्याच अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी सहाय्य्क निबंधक,सहकारी संस्था तुळजापूर यांना स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून,त्या संदर्भातील पत्र मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे यांनाही देण्यात आले आहे,मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी या संदर्भात सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क करत सातत्याने आढावा घेत आहेत . जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्या सूचनेनुसार लवकरच सहाय्यक निबंधक आणि मनसे पदाधिकारी यांच्यात चर्चा होणार आहे,
नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती होणे अत्यंत गरजेचे आहे, नळदुर्ग शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीचे ठरणार आहे. ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे महत्व कमी होऊ नये म्हणून उपसमितीला मनसेने तीव्र विरोध केला आहे.