श्रीराम चषक क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उदघाटन 

मुरूम, ता. उमरगा, दि. ९  : 

येथील श्रीराम जन्मोत्सव समिती व एसजी क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमानाने गाववाईज भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्रीराम चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवार  रोजी मुरूम येथील नगर परिषद मैदानात मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, श्रीराम कुलकर्णी, गोविंद कौलकर, केदार महामुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट सोहळ्याचे दिमाखात उदघाटन  संपन्न झाले.


 या स्पर्धेत प्रथम विजेत्या संघास कै. सुभाष आस्करराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्रीराम कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम एकावन्न हजार व चषक, द्वितीय विजेत्या संघास कै. भास्करराव गुंडेराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आदित्य कुलकर्णी व समस्त कुलकर्णी परिवराच्या वतीने रोख रक्कम पंचवीस हजार व चषक तर तृतीय विजेत्या संघास कै. शिवलाल कौलकर व कै. विलास भास्करराव महामुनी यांच्या स्मरणार्थ गोविंद कौलकर, केदार महामुनी यांच्या संयुक्त विद्यमानाने रोख रक्कम पंधरा हजार व चषक व त्याचबरोबर इतर वयक्तिक बक्षिसे असल्याची माहिती आयोजकांनी दिली. उदघाटन दरम्यान आयोजक, संयोजकसह मुरूम शहरातील क्रिकेट प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. 

           
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील  नगर परिषदेच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना मच्छिंद्र शेंडगे, श्रीराम कुलकर्णी, गोविंद कौलकर, केदार महामुनी आदींसह क्रिकेट प्रेमी
 
Top