नळदुर्ग : ऐतिहासिक किल्ल्यात युनिटी कंपनीकडून तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम
नळदुर्ग ,दि.१५
सोलापूर युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्यावतीने नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात मकर संक्रातनिमित्त किल्यातील पर्यटकांना तिळगुळ वाटप करण्यात आले.
युनिटी मल्टीकॉन्स कंपनी नळदुर्ग किल्ल्याचे व्यवस्थापक जुबेर काझी यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक खालिद काझी ,युनिटीचे जनसपंर्क अधिकारी विनायक अहंकारी, हाजी मस्तान शेख,प्रदीप गायकवाड,नागेश लंगडे,अमीर फुलारी, विक्रम बारुळे, कृष्णा ललाटे आदी उपस्थित होते.
यावेळी आलेले पर्यटक सुद्धा या कार्यक्रमाने भारावून गेले हिंदू मुस्लिम समाज मिळून हा मानवता शिकवणारा मकर संक्रात सण नळदुर्ग किल्यात युनिटीच्या वतीने साजरा झाला. तसा प्रत्येक ठिकाणी व्हावा,जेणेकरुन समाजातली एकमेकांबद्दलची कटुता पण कमी होईल.
युनिटी कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी.. युनिटीचे संचालक जयधवल करकमकर व युनिटीचे संचालक श्रीमती वैशाली ताई जैन हे तीन वेगवेगळ्या धर्माचे आणि विचाराचे एकत्र येवून काम करतात, त्यांच्यातला गोडवा जसा रोज कामातून व्यक्त होतो. तसा आदर्श समाजासमोर यावा यासाठी युनिटी मल्टीकॉन्स वेगवेगळ्या समाजीक उपक्रमातून काम करीत आहे.