केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांचा नागरिकानी लाभ घेण्याचे आवाहन
नळदुर्ग उपजिल्हा रूग्णालयात दिव्यांगाना तीनचाकी सायकलीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हास्ते वाटप
नळदुर्ग, दि.१३ :एस.के.गायकवाड
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्य व गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी नळदुर्ग शहरातील उपजिल्हा रूग्णालयात शनिवारी एडीआयपी योजनेअंतर्गत लाभार्थी दिव्यांगाना तीनचाकी सायकलीचे वाटप कार्यक्रमात आवाहन केले.
शहरातील उपजिल्हा रूग्णालयात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने मंजूर दिव्यांग लाभार्थ्यांना तुळजापूर विधानसभेचे आमदार पाटील यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी २९ दिव्यांग लाभार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले.
नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामुळे नळदुर्ग हे पर्यटनस्थळ तर रामतीर्थ देवस्थान मुळे मिनी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात असून नळदुर्ग हे अनेक गावांच्या केंद्रस्थानी असल्याने याठिकाणी आप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. तसेच शहरातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन शासनाकडून ४३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनास मंजुरी मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक विकासात्मक योजना नळदुर्ग शहरात राबविण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
यावेळी अॕड.दिपक अलुरे, तेरणा आभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, भिवा इंगोले,आनंद कंदले, माजी नगरसेवक संजय बताले, भाजप शहाध्यक्ष धिमाजी घुगे,विलास राठोड, उपजिल्हा रूग्णालयाचे अधिष्ठाता , डॉ.ईस्माइल मुल्ला, महादेव पाटील, दत्ता राजमाने,भाजपा अपंग विभागाचे जिल्हा अध्यक्ष समाधान मते,विठ्ठल गायकवाड , संजय विठ्ठल जाधव, दुर्वास बनसोडे, एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ , सुनील चौधरी, गणेश मोरडे यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील बनसोडे यानी केले.